पुण्यातून वसंत मोरे यांना लोकसभेची उमेदवारी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून, या यादीत 5 उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले असल्याची माहिती पक्षाच्या अधिकृत हॅंडलवरुन दिली आहे. यामध्ये नांदेडमधून अविनाश भोसीकर, परभणीतून बाळासाहेब उगले, औरंगाबादमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरुरमधून मंगलदास बांदल यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
तसेच, पुणे मतदारसंघातील धडाडीचे आमदार वसंत मोरे कोणत्या पक्षासोबत जातील, याची चर्चा जोरात सुरू होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीत त्यांनी प्रवेश करुन या चर्चेला विराम दिला आहे. याचबरोबर वंचितने तिसरी यादी जाहीर केली असल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आत्तापर्यंत एकूण 25 उमेदवार आतापर्यंत रिंगणात उतरवले आहे.
बारामतीत शरद पवार यांच्या पक्षाला पाठिंबा
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीची तिसरी यादी जाहीर केली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवाराला बारामतीमधून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.