Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीची अकोल्यात युवतींसाठी पहिली शाखा सुरू

mosami kewat by mosami kewat
June 24, 2025
in बातमी, सामाजिक
0
वंचित बहुजन युवा आघाडीची अकोल्यात युवतींसाठी पहिली शाखा सुरू

वंचित बहुजन युवा आघाडीची अकोल्यात युवतींसाठी पहिली शाखा सुरू

       

अकोला : वंचित बहुजन युवा आघाडीने अकोला शहरात युवती आणि महिलांसाठी आपली पहिली शाखा पंचशील नगर बायपास येथे मोठ्या उत्साहात सुरू केली आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे व महासचिव राजकुमार दामोदर यांच्या नेतृत्वात अकोला महानगराच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी महानगर अध्यक्ष वैभव खडसे यांनी शाखेच्या नवनियुक्त अध्यक्ष, महासचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. पक्षहिताचे काम करण्याबरोबरच परिसरातील युवतींच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. श्रद्धांजली बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत “वंचित बहुजन युवा आघाडीचा विजय असो!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

युवतींमध्ये असलेला उत्साह पाहून पक्षाला या परिसरातून नक्कीच बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या शाखा स्थापनेसाठी पायल कांबळे आणि नंदिनी ढोले या दोन्ही युवतींनी विशेष मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये महानगर अध्यक्ष वैभव खडसे, महानगर महासचिव रितेश यादव, महानगर संघटक आकाश गवई, सोशल मीडिया प्रमुख सुरज दामोदर, सोशल मीडिया प्रमुख साहिल बोदडे, उपाध्यक्ष आशिष सोनोने, महानगर सचिव सचिन डोंगरे, प्रसिद्धीप्रमुख आकाश जंजाळ, तसेच शाखेच्या नवनियुक्त पदाधिकारी पूजा वानखडे (शाखा अध्यक्ष), साक्षी इंगळे (शाखा उपाध्यक्ष), पूनम कांबळे (महासचिव), साक्षी वानखडे (सचिव), नीता सुरवाडे (शाखा संघटीका), दिव्या सावळे (कोषाध्यक्ष), प्रांजलि शेगोकर (मीडिया प्रमुख), समीक्षा इंगळे (प्रसिद्धी प्रमुख) यांचा समावेश होता.

याशिवाय, गीता गवई, मंगला तेलगोटे, शिला गवई, गंगू खंडारे, अनिता कांबळे, शिला इंगळे, देवका अंभोरे, निर्मला इंगळे, कांता तायडे, ज्योति वानखड़े, संध्या वानखड़े, सर्वजा तायडे, गौकर्ण हिवराले, वंदना गवई, वनमाला पातोडे, दर्शना खंडारे, चंद्रकला पाहुरकर, नीता सुर्वे, विद्या वाहुरवाघ, साहू गोपनारायण, छाया तेलगोटे, लता इंगले, फूला वानखड़े, मंगला तायडे, छाया दाभाड़े, माला शेगोकर, रूपा तेलगोटे, सविता ढोले, पुष्पा शिरसागर, निरवता डोंगरे, अलका सोनोने, बेबबाई इंगळे,संगीता उपरवत, माया पलसपगार, रेखा वाघमारे, मनीषा जामनिक, आशा कांबळे टोम्पे, सुमन कांबळे, चंद्रकला तायडे, कविता वानखड़े, सुशीला वानखड़े, सुमन कांबळे, स्वाति टोम्पे, अंजना चोपड़े, सविता इंगळे, आम्रपाली इंगोले, मंगला कांबळे, सुमन सिरसाठ, उज्ज्वला वानखड़े यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

14:59


       
Tags: AkolabranchvbaforindiaWomen
Previous Post

Palghar News : ‘घे भरारी तुझ्या स्वप्नांची’ – दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

वैष्णवी हगवणे/कस्पटे हत्या : आधी कोपर्डीचे सांगा! मग ठरावाचे बोला!

Next Post
वैष्णवी हगवणे/कस्पटे हत्या : आधी कोपर्डीचे सांगा! मग ठरावाचे बोला!

वैष्णवी हगवणे/कस्पटे हत्या : आधी कोपर्डीचे सांगा! मग ठरावाचे बोला!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत - ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका
बातमी

‎विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका

by mosami kewat
August 7, 2025
0

‎शरद पवार तर भाजपचे हस्तकच - ॲड. प्रकाश आंबेडकर‎‎मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान...

Read moreDetails
ॲड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर कोर्टात हजर, वकिलांशी साधला संवाद

ॲड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर कोर्टात हजर, वकिलांशी साधला संवाद

August 7, 2025
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; मुंबई येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; मुंबई येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

August 7, 2025
पुणे विमानतळावर 6 कोटींचा गांजा जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक

पुणे विमानतळावर 6 कोटींचा गांजा जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक

August 7, 2025
Pune Monsoon: पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात; अनेक भागांत पाणी साचले!

Pune Monsoon: पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात; अनेक भागांत पाणी साचले!

August 7, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home