नालासोपारा : अर्नाळा पोलिसांच्या हद्दीतील कळंब समुद्रकिनाऱ्यावर आज एक अज्ञात आणि संशयास्पद कंटेनर वाहून आल्याने स्थानिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, हा कंटेनर मालवाहू जहाजातून समुद्रात पडला असावा आणि लाटांच्या साहाय्याने किनाऱ्यावर वाहत आला.
सुरुवातीला या कंटेनरमध्ये वॉलपेपर असल्याचे दिसून आले आहे, मात्र त्याची सखोल तपासणी आणि पंचनामा पूर्ण झाल्यानंतरच त्यातील नेमक्या वस्तूंची माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. अर्नाळा पोलीस, तटरक्षक दल (कोस्टल गार्ड) आणि इतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या समुद्राला भरती असल्याने कंटेनर अजूनही पाण्यामध्ये आहे.
त्यामुळे ओहोटीची प्रतीक्षा केली जात आहे, जेणेकरून कंटेनरची पूर्णपणे तपासणी करता येईल. हा कंटेनर कुठून आला, तो समुद्रात कसा पडला आणि त्यात काही संशयास्पद वस्तू आहेत का, याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. अज्ञात कंटेनर सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी, पोलीस आणि यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
संविधान सन्मान महासभेतून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भाजप – आरएसएसवर जोरदार प्रहार!
ॲड. प्रकाश आंबेडकर : मोहन भागवत हिटलर - मुसोलोनी तुमचा आदर्श! मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आयोजित संविधान...
Read moreDetails






