बीड : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण निवडणूक प्रचार सभा आज कसबा विभाग, धारूर येथे संपन्न झाली. ‘संवाद चळवळीतील तरुणाईशी’ या खास उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या सभेला धारूर परिसरातील तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.ही सभा सकाळी ११ वाजता, कसबा विभाग, धारूर निवडणूक प्रचार सभा झाली.
सुजात आंबेडकर यांनी यावेळी तरुणांशी थेट संवाद साधला. शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि चळवळीतील तरुणांची भूमिका यांसारख्या ज्वलंत विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत तरुणांनी सजग राहून सक्रिय सहभाग घेणे का महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.
या सभेमुळे धारूर परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि विशेषतः युवा वर्गामध्ये एक नवा उत्साह संचारल्याचे दिसून आले.





