देवणी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत प्राचारला वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे युवा नेते आणि ‘युथ आयकॉन’ सुजात आंबेडकर यांचा आज, शनिवार (दि. ३१) देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे स्थानिक राजकारणात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. (Sujat ambedkar election Campaign)
आजच्या दौऱ्याची सुरुवात दुपारी रॅलीने होणार असून सायंकाळी जाहीर सभांनी प्रचार होणार आहे. कार्यक्रमाचे सविस्तर नियोजन खालीलप्रमाणे आहे:
दुपारी ४.०० वाजता: थेरगाव येथे भव्य रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन.
सायंकाळी ५.०० वाजता: वलांडी येथे जाहीर सभा; मतदारांशी थेट संवाद.
सायंकाळी ६.०० वाजता: देवणी येथील पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन.
सायंकाळी ६.३० वाजता: साकोळ येथे भव्य जाहीर सभा आणि दौऱ्याचा समारोप.
सुजात आंबेडकर यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण मतदारांना साद घालण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर ‘वंचित’चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सुजात आंबेडकर या सभांमधून कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. (Sujat ambedkar election Campaign)
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर थेरगाव, वलांडी, देवणी आणि साकोळ परिसरातील कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






