Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सुजात आंबेडकर आज लातूर दौऱ्यावर; देवणी आणि शिरूर अनंतपाळमध्ये प्रचाराचा धडाका

mosami kewat by mosami kewat
January 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सुजात आंबेडकर आज लातूर दौऱ्यावर; देवणी आणि शिरूर अनंतपाळमध्ये प्रचाराचा धडाका
       

​देवणी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत प्राचारला वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे युवा नेते आणि ‘युथ आयकॉन’ सुजात आंबेडकर यांचा आज, शनिवार (दि. ३१) देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे स्थानिक राजकारणात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. (Sujat ambedkar election Campaign)

​आजच्या दौऱ्याची सुरुवात दुपारी रॅलीने होणार असून सायंकाळी जाहीर सभांनी प्रचार होणार आहे. कार्यक्रमाचे सविस्तर नियोजन खालीलप्रमाणे आहे:

​दुपारी ४.०० वाजता: थेरगाव येथे भव्य रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन.

​सायंकाळी ५.०० वाजता: वलांडी येथे जाहीर सभा; मतदारांशी थेट संवाद.

​सायंकाळी ६.०० वाजता: देवणी येथील पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन.

​सायंकाळी ६.३० वाजता: साकोळ येथे भव्य जाहीर सभा आणि दौऱ्याचा समारोप.

​सुजात आंबेडकर यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण मतदारांना साद घालण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर ‘वंचित’चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सुजात आंबेडकर या सभांमधून कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. (Sujat ambedkar election Campaign)

​या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर थेरगाव, वलांडी, देवणी आणि साकोळ परिसरातील कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


       
Tags: ElectionElection campaigLatur electionSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadivbaforindiaZilla ParishadZilla Parishad elections
Previous Post

Free Sanitary Pads : मोठा निर्णय! आता शाळांमध्ये सॅनिटरी पॅड्स मोफत मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्यांना आदेश

Next Post

सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

Next Post
सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर
बातमी

धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

by mosami kewat
October 22, 2026
0

अकोला : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव–२०२६ निमित्त अकोला येथे...

Read moreDetails
साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

October 22, 2026
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

October 22, 2026
हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

October 20, 2026
केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

October 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home