वसई-विरार : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या साध्या राहणीमानाने आणि आक्रमक कार्यशैलीने वसई-विरार पट्ट्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राजकीय नेत्यांच्या ताफ्यांची मोठी चर्चा होत असताना, सुजात आंबेडकर यांनी मात्र वेळेचे महत्त्व राखत सार्वजनिक वाहतुकीला पसंती दिली. सभेच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘लोकलचा आधार घेतला. त्यांचा हा साधेपणा पाहून कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक भारावून गेले असून, सोशल मीडियावर त्यांच्या या प्रवासाचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

सुजात आंबेडकर यांच्या दौऱ्यामुळे वसई-विरारमधील जनसामान्यांच्या प्रश्नांवर मांडलेली आक्रमक भूमिका यामुळे मतदारसंघात त्यांचा मोठा ‘दरारा’ निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नवा उत्साह संचारला आहे.






