बोधगया : महाबोधी मंदिराच्या पूर्ण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर उद्या, रोजी बोधगया, बिहार येथे जाणार आहेत.
त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली असून, त्यांच्यासोबत बौद्ध समाज संवाद दौरा आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रतिनिधीही या आंदोलनात सामील होणार असल्याचे सांगितले आहे. आंबेडकर यांनी या लढ्याला बौद्धांच्या हक्कासाठी आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष म्हटले आहे.
त्यांनी सर्व बौद्धांना या मुक्ती आंदोलनात सहभागी होऊन त्याला बळकट करण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या पूर्ण नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी ही लढाई पूर्ण ताकदीने लढत राहतील, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
याआधी स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर हे या आंदोलनात सहभागी झाले होते. व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे देखील सहभागी झाले होते. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेने मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन सुरू केले आहे, आता थेट बिहारमध्ये जाऊन वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करत आहे.
सक्षम ताटे हत्या प्रकरण: पोलीस कारवाईच्या मागणीसाठी आचल ताटे अन् मातेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
नांदेड : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या सक्षम ताटे खून प्रकरणातील संताप आता रस्त्यावर आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींच्या अटकेनंतर...
Read moreDetails






