कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडी जिल्हा कोल्हापूर तालुका शिरोळ अंतर्गत उदगाव या गावी पक्षाच्या शाखेचे उद्घाटन युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते प्रशांत बोराडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, जिल्हा सचिव अरुण जमिनी, जिल्हा संघटक विश्वास शिंगे, शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, तालुका उपाध्यक्ष किशोर सासणे, तालुका महासचिव गौतम कांबळे व तालुका संघटक निखिल कांबळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
उद्घाटन सोहळ्यादरम्यान पक्षविस्तार, संघटन बळकटीकरण आणि आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मजबूत सहभागाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उदगाव शाखेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील सामाजिक व राजकीय प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.