पुणे : लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज पुणे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. पुण्यातील प्रभाग क्रमांक ७ मधील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपले मत नोंदवले.
मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुजात आंबेडकर यांनी सर्व नागरिकांना, विशेषतः तरुणांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी ते म्हणाले की, “प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नोंदवावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.





