येडशी : धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीने जिल्हाभरातील वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला आक्रमक प्रचार सुरू केला आहे. धाराशिव पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार सिमरन फारूक शिकलगार यांच्या प्रचारार्थ येडशी गणात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा शुक्रवार काल ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात पार पडली.
बदलासाठी ‘वंचित’ला साथ देण्याचे आवाहन
सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्षांच्या धोरणांवर कडाडून टीका केली. सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि स्थानिक विकासाचा चेहरा बदलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. (Sujat ambedkar election Campaign)
सायंकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या सभेला येडशी परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सुजात आंबेडकर यांचे आगमन होताच घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. (Sujat ambedkar election Campaign)
यावेळी या सभेला धनंजय सोनटक्के (जिल्हा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), शीतल चव्हाण (युवा जिल्हा अध्यक्ष), अनुराधा लोखंडे (महिला जिल्हा अध्यक्ष), सागर चंदनशिवे (युवा तालुका अध्यक्ष) हे उपस्थित होती. तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





