Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सिमरन फारुक शिकलगार यांच्या प्रचारासाठी येडशीत सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

mosami kewat by mosami kewat
January 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सिमरन फारुक शिकलगार यांच्या प्रचारासाठी येडशीत सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
       
येडशी : धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीने जिल्हाभरातील वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला आक्रमक प्रचार सुरू केला आहे. धाराशिव पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार सिमरन फारूक शिकलगार यांच्या प्रचारार्थ येडशी गणात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा शुक्रवार काल ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात पार पडली.

बदलासाठी ‘वंचित’ला साथ देण्याचे आवाहन

सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्षांच्या धोरणांवर कडाडून टीका केली. सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि स्थानिक विकासाचा चेहरा बदलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. (Sujat ambedkar election Campaign)

सायंकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या सभेला येडशी परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सुजात आंबेडकर यांचे आगमन होताच घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. (Sujat ambedkar election Campaign)

यावेळी या सभेला धनंजय सोनटक्के (जिल्हा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), शीतल चव्हाण (युवा जिल्हा अध्यक्ष), अनुराधा लोखंडे (महिला जिल्हा अध्यक्ष), सागर चंदनशिवे (युवा तालुका अध्यक्ष) हे उपस्थित होती. तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Election campaignMaharashtraPoliticalpolticsSujat Ambedkar election campaignZilla Parishad
Previous Post

अमानवीय! बिहारमध्ये अंत्ययात्रेला रस्ता नाकारला; महादलित कुटुंबाने रस्त्याच्या मधोमध केला अंत्यसंस्कार

Next Post

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची शपथ; खात्यांच्या वाटपात भाजपने खेळली मोठी ‘खेळी’

Next Post
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची शपथ; खात्यांच्या वाटपात भाजपने खेळली मोठी ‘खेळी’

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची शपथ; खात्यांच्या वाटपात भाजपने खेळली मोठी 'खेळी'

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home