जामखेड : भटक्या विमुक्त समाजाच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यदिनानिमित्त जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर रोडवरील महावीर मंगल कार्यालयात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भटक्या विमुक्त समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले, जेणेकरून समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळेल. ही परिषद ऐतिहासिक ठरली, ज्यात समाजाच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण, परिषदेचे आयोजक आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांच्यासह भटक्या विमुक्त समाजातील अनेक प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.