अकोला : पातूर पंचायत समिती सदस्या रेखा हरि इंगोले यांचे पती हरि इंगोले यांचे आकस्मिक निधन झाल्याची दु:खद घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने इंगोले कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
आज डॉ. आनंद शर्मा यांच्या रुग्णालयात जाऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी इंगोले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांची विचारपूस करत धीर दिला व दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. (prakash ambedkar)
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, तालुका अध्यक्ष किशोर जामानिक तसेच ॲड. आकाश भगत उपस्थित होते. हरि इंगोले यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. (prakash ambedkar)
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर...
Read moreDetails






