नांदेड : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे भव्य ‘कार्यकर्ता संवाद बैठक’ उत्साहात पार पडली. शिवाजी नगर भागातील हॉटेल विसावा पॅलेस येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. संघटनेची बांधणी अधिक मजबूत करणे आणि तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून वंचित घटकांच्या हक्कासाठी लढा देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
काँग्रेसचा जुना मीडिया खेळ पुन्हा सुरू; खोट्या चर्चांना बळी पडू नका – वंचित बहुजन आघाडी
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी या बैठकीतून नवी ऊर्जा देण्यात आली.
कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यकर्ता संवाद बैठकीला नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सक्रीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉटेल विसावा येथील सभागृह कार्यकर्त्यांच्या गर्दीने तुडुंब भरले होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.





