Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा समाजवादी पक्षाला पाठिंबा – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 13, 2022
in बातमी
0
उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा समाजवादी पक्षाला पाठिंबा – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

आरएसएस-भाजपला रोखण्याचे आंबेडकरवादी, सेक्युलर मतदारांना आवाहन

मुंबई / प्रतिनिधी :  उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) वंचित बहुजन आघाडीने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. दादर येथील आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली 

या संदर्भात बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आरएसएस-बिजेपीचे केंद्रातील सरकार ईडी, इनकम टॅक्स, आणि सीआयडी सारख्या एजन्सीचा वापर करून विरोधी पक्ष खिळखिळा करू पाहत आहे.

बिजेपीला येत्या २०२४ मध्ये स्वतःचा मार्ग मोकळा करून देशाचे संविधान बदलण्याचे राजकारण सुरु करायचे आहे. या पक्षांचा केंद्रात जाण्याचा मार्ग उत्तर प्रदेश (UP Election 2022) मधून जातो. पण आताच्या परिस्थितीमध्ये बसपा किंवा चंद्रशेखर आझाद हे बीजेपीला टक्कर देऊ शकतील असे वाटत नाही. त्यामुळे सध्या समाजवादी पक्ष विरुद्ध आरएसएस अशी परिस्थिती आहे म्हणून असा निर्णय घेतला आहे. आंबेडकरी जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा.

आंबेडकरवादी मतदाराचे स्वतंत्र अस्तित्व आहे. एका निवडणुकीमध्ये बायपास दिला तर फरक पडत नाही असे आम्ही मानतो. आपण स्वतःचे अस्तित्व हे निवडणुकीनंतर देखील सुरुवात करता येईल. मानवतावादी, सेक्युलरवादी, आंबेडकरवादी मतदारांनी समाजवादी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे’ असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. आरएसएस आणि बीजेपी वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती अथवा पाठिंबा देण्यास सहमती असल्याचे देखील त्यांनी सांगितले.


       
Tags: ElectionPrakash AmbedkarSamajwadi PartyUttar PradeshVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट!

Next Post

वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष  पदावर सुनिता गायकवाड यांची नियुक्ती

Next Post
वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष  पदावर सुनिता गायकवाड यांची नियुक्ती

वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष  पदावर सुनिता गायकवाड यांची नियुक्ती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
Uncategorized

प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

by mosami kewat
January 9, 2026
0

पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा पुणे : छोट्या व प्रादेशिक पक्षांना फोडून त्यांना कमकुवत करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने...

Read moreDetails
चीनसारखी एकाधिकारशाही भाजपला भारतात आणायची! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा

चीनसारखी एकाधिकारशाही भाजपला भारतात आणायची! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा

January 9, 2026
महू नगर, राहुल नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावती दौरा; ‘वंचित’च्या उमेदवारांसाठी प्रत्यक्ष जनसंवाद

महू नगर, राहुल नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावती दौरा; ‘वंचित’च्या उमेदवारांसाठी प्रत्यक्ष जनसंवाद

January 9, 2026
मुंबई महापालिका निवडणूक: आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी 'वंचित'ला साथ द्या; मुंबईत प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा एल्गार

मुंबई महापालिका निवडणूक: आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी ‘वंचित’ला साथ द्या; मुंबईत प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा एल्गार

January 9, 2026
सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रभाग १७ मध्ये 'वंचित'ची भव्य रॅली; जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रभाग १७ मध्ये ‘वंचित’ची भव्य रॅली; जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

January 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home