Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Vanchit Bahujan Aaghadi : अकोला जिल्हा परिषदेतील प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे सीईओंना निवेदन!

mosami kewat by mosami kewat
June 18, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, सामाजिक
0
Vanchit Bahujan Aaghadi : अकोला जिल्हा परिषदेतील प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे सीईओंना निवेदन!

Vanchit Bahujan Aaghadi : अकोला जिल्हा परिषदेतील प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे सीईओंना निवेदन!

       

अकोला : अकोला जिल्हा परिषद बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सुरू असून, कामवाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असून, जलजीवन मिशनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार तसेच खासगी शाळांमध्ये गणवेश आणि शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांवर लादली जाणारी सक्ती या मुद्द्यांवर वंचित बहुजन युवा आघाडीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, बांधकाम विभागात अधिकारी आणि विशिष्ट कंत्राटदारांच्या संगनमताने कामवाटपाची प्रक्रिया पूर्णपणे भ्रष्ट पद्धतीने चालवली जाते. मजूर सोसायटी, सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि लहान कंत्राटदारांना शासन निर्णयांचे पालन न करता केवळ किरकोळ कामांवर बोळवण केली जाते, तर मोठी कामे ठराविक कंत्राटदारांना ई-निविदा न करता मिळतात. एकाच संगणकावरून निविदा भरल्या जात असून डिजिटल सिग्नेचरचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.निवेदनात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, शासनाच्या आदेशाने कामे ‘क्लब’ करून रक्कम वाढवली जाते, ज्यामुळे लहान कंत्राटदार थेट स्पर्धेबाहेर जातात. हा प्रकार देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे.

जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराचेही धक्कादायक तपशील जिल्ह्यातील २८४ पैकी केवळ ११२ जलजीवन मिशनची कामे पूर्ण झाली असल्याचे आकडे असून, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी केवळ कागदावरच योजना पूर्ण झाल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात आला. अनेक गावे अजूनही पाण्याविना आहेत, रस्ते खोदलेले आहेत, तर पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध नसतानाही बिले काढून कामे पूर्ण दाखवण्यात आली आहेत.

शाळांतील सक्तीवरही आवाज –

अकोला जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये पालकांना विशिष्ट दुकानातूनच गणवेश व पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. शिक्षण विभाग या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असून, यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.या निवेदन प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष वैभव खडसे, सचिन शिराळे, सुरेंद्र तेलगोटे, जय तायडे, आकाश गवई, आकाश जंजाळ, सूरज दामोदर (सोशल मीडिया प्रमुख), नागेश उमाळे, योगेश वाडाळ, संतोष वनवे, राजेश बोदडे, अमोल डोंगरे, विजय पातोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: AkolaCorruptiongovernmentVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Vanchit Bahujan Aaghadi : भीमशक्ती नगरमध्ये डेंग्यू-मलेरियाचा कहर; स्वच्छतेसाठी VBA माथाडी युनियनचे आयुक्तांना निवेदन!

Next Post

Kolhapur Crime : धक्कादायक! ‘संस्था बंद पडावी’ म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या!

Next Post
Kolhapur News : धक्कादायक: 'संस्था बंद पडावी' म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या!

Kolhapur Crime : धक्कादायक! 'संस्था बंद पडावी' म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
स्टार बॉक्सर निखत जरीनने वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये गोल्ड मेडल जिंकले!
बातमी

स्टार बॉक्सर निखत जरीनने वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये गोल्ड मेडल जिंकले!

by mosami kewat
November 21, 2025
0

भारताची स्टार बॉक्सर आणि दोन वेळा विश्वविजेती असणारी निखत जरीन हिने बॉक्सिंग मध्ये शानदार पुनरागमन करत वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स...

Read moreDetails
बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!

बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!

November 20, 2025
संविधान सन्मान महासभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भारतीय बौद्ध महासभा

संविधान सन्मान महासभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भारतीय बौद्ध महासभा

November 20, 2025
प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा

प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा

November 20, 2025
नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू - वंचित बहुजन आघाडी

नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू – वंचित बहुजन आघाडी

November 20, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home