सोलापूर : वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर आणि जिल्ह्याने सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या न्यायालयीन लढाईला यश मिळाल्याचे पक्षाने म्हटले आहे.
औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच पोलिसांना संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकार आणि पोलिसांनी या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कायदेशीर टीमने केलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या निकालानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे. पक्षाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई, विजयाबाई सूर्यवंशी, यांच्या धैर्याचे आणि बाळासाहेब आंबेडकरांवरील विश्वासाचे कौतुक केले. या लढ्यात विजयाबाई यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या निकालाचे स्वागत करताना सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर आणि विजयाबाई सूर्यवंशी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीनेही या निकालाचे स्वागत करत अभिनंदन केले.
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!
बीड : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन पूर्ण ताकतीने लढत आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...
Read moreDetails






