सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अय्युब सय्यद या पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लष्कर परिसरातील त्यांच्या राहत्या घरात हा प्रकार घडला असून या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. (Solapur Crime News)
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होते. सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो प्रचंड लोकप्रिय होते, ज्याला लाखो व्ह्यूज मिळत होते. शनिवारी दुपारी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सावधान! तुम्ही पिताय ते दूध आहे की ‘पांढरं विष’? अंधेरीत दूध माफियांचा भयानक कारनामा उघड!
सीसीटीव्ही फुटेजमधून मोठा उलगडा
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, धक्कादायक दृश्ये समोर आली आहेत. रात्री ११:३० च्या सुमारास तीन अनोळखी इसम अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर पहाटे २:०० च्या सुमारास हेच तीन संशयित इसम घरातून बाहेर पडून निघून जाताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. (Solapur Crime News)
या अडीच तासांच्या कालावधीतच त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळा: ३१ डिसेंबरपासून पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या वाहतुकीत मोठे बदल
अय्युब सय्यद यांच्या हत्येनंतर पोलिसांकडून शोध सुरू
अय्युब सय्यद यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली? हा राजकीय वादाचा प्रकार आहे की वैयक्तिक शत्रुत्व? याचा तपास सोलापूर शहर पोलीस करत आहेत. लोकप्रिय पारलिंगी उमेदवाराची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे लष्कर परिसरात तणावाचे वातावरण असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.






