अनेक वर्षे संवेदनशील शहर ओळख असलेल्या अकोला शहरातील सामाजिक सौहार्द बरेच वर्षे टिकून होते. अकोला शहरातील सर्व जाती धर्माच्या नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरू ह्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून हे शहर शांत केले होते.सौहार्द निर्माण केले होते.
मात्र काल ह्या शहराच्या शांततेला नख लागले आहे. धार्मिक भावना भडकावणारे पोस्ट मुळे जातीय दंगल होवून एक जीव गेला असून काही जण जखमी असून मोठ्या प्रमाणात दगडफेक, जाळपोळ झाली आहे.पोलिसांनी काल रात्रभर मोठ्या प्रयासाने शहरात शांतता प्रस्थापित केली आहे.संचारबंदी लागू करण्यात आली असून शहरात तूर्त शांतता आहे.पोलिसांनी कॉम्बिन्ग ऑपरेशन सुरू केले असून अटकसत्र सुरू आहे.अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आम्ही करत आहोत.
भाजप जनप्रतिनिधी थेट पोलिसांवर आरोप करीत आहेत.खरे तर अश्या परिस्थिती मध्ये वातावरण अधिक बिघडणार नाही.दोषी कुणीही असो त्यांनाच अटक व शिक्षा व्हावी ही भूमिका अपेक्षित आहे.निरपराध नागरिक भरडले जाऊ नयेत.जनप्रतिनिधी ह्यांनी दोन्ही बाजूंच्या निरपराध नागरिकांच्या सुरक्षा आणि शहर व जिल्हा मधील शांतता सुव्यवस्था आणि सामाजिक सौहार्द कायम रहावे ह्या वर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
आपल्याला ह्याच शहरात जीवन व्यतीत करायचे असल्याने कुणीही एकतर्फी भूमिका घेऊ नये आणि हिंदू मुस्लिम असा भेद होऊ नये अशी भूमिका घेतली तर शहरात लवकर शांतता प्रस्थापित होईल.गुन्हेगार पाठिशी घातले जाऊ नयेत असा पवित्रा घेऊन शहरातील राजकीय नेते आणि धर्मगुरू, पत्रकार आणि डॉक्टर, प्राध्यापक इंजिनिअर बुद्धीजीवी ह्यांनी शांततेसाठी आवाहन करावे, अशी अपेक्षा आहे.
पोलीस आपले काम करीत आहेतच ह्या शहराचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी देखील लवकरात लवकर हे द्वेषपूर्ण वातावरण निवळण्या साठी पुढे आले पाहिजे.
निरपराध व्यक्तीला अटक नको आणि दोषी कुणीही असो त्याची सुटका नको हीच भूमिका असावी.
राजेंद्र पातोडे
अकोला
9422160101