बीड : राज्यातील गोरगरिबांना स्वस्त दरात पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेवर पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाल्याचे पहायला मिळाले आहे.
बीड जिल्ह्यातून व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या योजनेच्या अंमलबजाणीतील गैरप्रकारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओत एकाच शिवभोजन थाळीसाठी अनेक वेगवेगळ्या व्यक्तींचे फोटो काढले जात असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे निधीच्या अपहाराची शक्यता वर्तवली जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
बीड जिल्ह्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोबाईल घेऊन बसलेली असून, समोर एक शिवभोजन थाळी ठेवलेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या थाळीसमोर एकामागोमाग एक अशा वेगवेगळ्या वयोगटांतील व्यक्तींना बसवून त्यांचे फोटो घेतले जात आहेत. ही प्रक्रिया पाहता, एकाच थाळीसाठी अनेक लाभार्थी दाखवून सरकारी निधी लाटण्याचे काम होत आहे. आहे. हा प्रकार असल्याची टीका आता सुरू झाली आहे.
योजनेअंतर्गत शिवभोजन थाळी देताना लाभार्थ्याचे नाव आणि फोटो घेणे बंधनकारक आहे. एका विशिष्ट अॅपद्वारे हे सर्व तपशील अपलोड करणे आवश्यक असते. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील प्रकारामुळे लाभार्थी दाखवून पैसे लाटले जात आहेत का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
परभणी तालुक्यात धारगाव येथे वंचित बहुजन आघाडीत कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने पक्षप्रवेश
परभणी : परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी सर्कलमधील धारगाव येथे वंचित बहुजन आघाडीत अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष (उत्तर) तुकाराम...
Read moreDetails