पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान नेते सुनिलजी गवळी यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आपल्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश झाला.
या प्रवेश सोहळ्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यामध्ये महिला आघाडी शहर सचिव सविता चाबुकस्वार, शहर सदस्य धर्मराज कदम, शहर युवा उपाध्यक्ष अजित वाघमारे, शहर युवा उपाध्यक्ष स्वप्नील वाघमारे, पुणे कॅन्टोन्मेंट महासचिव अभिजित बनसोडे, उपाध्यक्ष ओंकार कांबळे, प्रभाग क्र. १४ समन्वयक श्रीधर जाधव, श्रीनिवास दासारी, प्रवीण बागुल यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनिल गवळी यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.