मुंबई : आम्हाला शरद पवार यांनी अमरावती येथे प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या विधानाची माहिती मिळाली, ज्यात त्यांनी असे म्हटले होते की, मल्लिकार्जुन खर्गे यांना वंचित बहुजन आघाडीच्या च्या पत्राला उत्तर देण्याची आणि वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे निमंत्रण देण्याची विनंती त्यांनी दिल्लीत केली होती. १९ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या चौथ्या इंडिया आघाडी बैठकीत शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही कौतुक करतो असे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते, सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.
अद्याप आम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिल्लीतील मुख्यालय किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयाकडून कोणतेही पत्र किंवा कॉल किंवा कोणत्याही प्रकारचा संवाद प्राप्त झालेला नाही. तथापि, आम्ही सकारात्मक आहोत. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी या दोन्हीमध्ये आमंत्रित करण्यासाठी काँग्रेसकडून प्रतिसादाची वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सामील करून घेण्यासाठी मी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संवाद साधणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत यावं हीच सर्वांची ईच्छा असल्याचे वक्तव्य अमरावती येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. या पार्श्वभुमीवर वंचित ने शरद पवारांच्या भूमिकेचे कौतुक केले.