पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील पक्षसंघटनांनी एकत्रीत दिलेला लढा यशस्वी
पुणे : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन” शेजारील व ससून हॉस्पिटल पुणे, समोरील जवळपास २ एकर जागा विस्तारित स्मारकासाठी शासनाने द्यावी याकरिता २५ वर्षांपासूनची आंबेडकरी अनुयायांनीची मागणी होती. या मागणीसाठी शुक्रवारी (दि.7) आंबेडकरी जनतेने आंदोलन केले. शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा करून ही सव्वा दोन दोन एकर जागा संविधान भवनासाठी, आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचे मान्य केले.
शिष्ट मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष वसंतदादा साळवे यांनी याबाबत आंदोलकांना सांगितले, तेव्हा आंदोलकांनी जल्लोष केला. जिल्हाधिकाऱ्यांनी जरी आश्वासन दिले असले, तरी गाफील राहून चालणार नाही असेही साळवे यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी (दि.7)फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंतीदिनी भव्य धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचे घोषित करण्यात आले होते. पुणे शहरातील आंबेडकरी जनतेने हे आंदोलन आपल्या हातात घेतल्याने शहरात बैठकांचे सत्र सुरू झाले, याचा परिणाम आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटना व त्यांचे नेते, आप आपसातील राजकीय मतभेद, व्यक्तिगत मतभेद, बाजूला ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी एकत्र येताना दिसले. मागील दोन दिवसांत प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देण्यासाठी पुढे सरसावल्याचे दिसले.
राजकारणात जरी आंबेडकरी अनुयायी एकत्र येत नसले, तरी सामाजिक आंदोलनात एकत्र येत अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. याच उदाहरण या धरणे आंदोलनामुळे समोर आले. या धरणे आंदोलनकरिता पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष-संघटना, जयंती मंडळे, बुद्ध विहार समित्या यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.