Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 3, 2025
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !
       

– निवडणूक आयोगाला कोर्टाने पाठवली नोटीस

– सायंकाळी 6 नंतर मतदान कसे वाढले ?

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी जाहीर करताना काही मतदारसंघात तफावत आढळली होती. त्यावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानंतर इतरही राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिकेद्वारे केलेल्या मागणीनुसार उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात खुलासा सादर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर ॲड. आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले होते.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “निवडणुकीचा निकाल देताना, पोल व्होटस् अन् काऊंटर व्होटस् यांची जुळवणी झाली पाहिजे. ती झाली नसेल, तर रिटर्निंग ऑफिसरने तो दस्ताऐवज निवडणूक आयोगाकडे पाठवले पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्यावर जे निर्देश देतील, त्यानुसार निकाल पाहिजे”. निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळली नाही, असाही आक्षेप ॲड. आंबेडकर यांनी घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान कसं वाढलं, यावर याचिकेद्वारे आक्षेप घेण्यात आला आहे. मतदानाचे व्हिडिओ देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून हा मुद्दा लावून धरला असून, केवळ प्रश्न उपस्थित करून आम्ही हा मुद्दा सोडून दिलेला नाही. तर आमचा पाठपुरावा सुरू आहे. न्यायालयीन पातळीवर आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत खुलासा करण्याची विनंती केली आहे, असे याचिका दाखल केली होती तेंव्हा आंबेडकर यांनी याआधी सांगितले होते. त्याच प्रकरणात आता हायकोर्टाने दखल घेऊन निवडणूक आयोगाला नोटीस बजावल्याने वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याचे हे मोठे यश मानले जात आहे.


       
Tags: Election commissionEVMMaharashtraPrabuddh BharatPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVidhansabha Election
Previous Post

अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन !

Next Post

२ एकर जागेत उभारणार, संविधान भवन !

Next Post
२ एकर जागेत उभारणार, संविधान भवन !

२ एकर जागेत उभारणार, संविधान भवन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home