हिंगोली : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आचारसंहितेचे सरासर उल्लंघन केले आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना एक व्हिडिओ समोर आला आहे.
मतदान केंद्रात जाऊन एका महिला मतदाराला मतदान करताना ‘बटण दाबा’ अशी थेट सूचना देताना संतोष बांगर दिसले. व्हिडिओ मध्ये संतोष बांगर यांनी “बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो” अशा घोषणा दिल्या.
दरम्यान, मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, मोबाईल फोन वापरणे किंवा कुठल्याही प्रकारे निवडणूक गोपनीयतेचा भंग करणे हे त्यामुळे बांगर यांच्या या कृत्यावर निवडणूक विभागाकडून कारवाईची मागणी होत आहे. संतोष बांगर यांच्या या व्हिडिओनंतर राजकीय वातावरण तापले आहे.





