Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाला यश! औरंगाबादेत मुलींच्या शैक्षणिक शुल्कमाफीबद्दल महत्त्वाचे परिपत्रक जारी

mosami kewat by mosami kewat
September 28, 2025
in बातमी
0
सम्यक विद्यार्थी आंदोलनाला यश! औरंगाबादेत मुलींच्या शैक्षणिक शुल्कमाफीबद्दल महत्त्वाचे परिपत्रक जारी

Group of happy students checking results on laptop while sitting on college campus - concept of education, technology and project work discussion

       

औरंगाबाद : मुलींना शैक्षणिक शुल्कमाफी लागू असूनही काही महाविद्यालयांकडून अन्यायकारक पद्धतीने शुल्क वसुली केली जात असल्याच्या तक्रारीनंतर सम्यक विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

आंदोलनाच्या मागणीची तत्काळ दखल घेत उच्च शिक्षण सहसंचालकांनी सर्व महाविद्यालयांना ‘कुठल्याच मुलींकडून फीस घेऊ नका’ असे तात्काळ परिपत्रक काढून आदेश दिले आहेत.

या संदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अक्रम खान यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांची भेट घेण्यात आली होती. या भेटीत सविस्तर चर्चा करून आंदोलनाच्या वतीने शुल्क वसुली रोखण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.

डॉ. पंकजा वाघमारे यांनी या मागणीची तात्काळ दखल घेतली आणि शुल्क माफीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यामुळे आता औरंगाबाद विभागातील कोणत्याही महाविद्यालयाला विद्यार्थिनींकडून शुल्क घेणे शक्य होणार नाही.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आवाहन केले आहे की, यापुढे कोणत्याही महाविद्यालयाने विद्यार्थिनींकडून शुल्क वसूल केल्यास, संबंधित विद्यार्थिनींनी तात्काळ सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.


       
Tags: collegeEducationEducation feesproteststudentVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

मारेगावात वंचित बहुजन आघाडीचा अभूतपूर्व ‘महाआक्रोश मोर्चा’

Next Post

Ladakh Protest : सोनम वांगचुक यांच्या संघर्षाला पाठिंबा : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
Ladakh Protest : सोनम वांगचुक यांच्या संघर्षाला पाठिंबा : ॲड. प्रकाश आंबेडकर

Ladakh Protest : सोनम वांगचुक यांच्या संघर्षाला पाठिंबा : ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर...

Read moreDetails
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home