कल्याण : डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर भाजपचा प्रचार करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी केला आहे. या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांना निवेदन देऊन भाजपचं चिन्ह ‘कमळ’ प्रतीकात्मक भेट म्हणून सुपूर्द केलं.
आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की, पालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावर भाजपच्या कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांचा व्हिडिओ भाजपच्या चिन्हासह प्रसारित करण्यात आला. यामुळे महानगरपालिका भाजपच्या दावणीला बांधली आहे का? असा सवाल उपस्थित होत असल्याचं ते म्हणाले.
या कृतीचा निषेध नोंदवत आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. पालिका ही सर्वसामान्य नागरिकांची असून तिच्या अधिकृत माध्यमांचा वापर एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी होणं निंदनीय आहे, असं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं. हा प्रकार लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून, मनपाच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, असेही त्यात म्हटले आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर छापे; राजकीय कनेक्शनची चर्चा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज पुणे आणि बारामती जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद...
Read moreDetails






