परभणी : पूर्णा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पूर्णा येथे पार पडला.
या पक्षप्रवेशामध्ये संतोष कांबळे, शेख गफार, नामदेव कणकटे, संदीप खंदारे, दीपक गाडे आणि अमोल आजगरे यांनी अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
कार्यक्रमाला जिल्हा सचिव रवी वाघमारे, तालुका महासचिव बंडू गाडे, प्रसिद्धी प्रमुख महेश कचरे, युवा शहर उपाध्यक्ष अजय काळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका कोषध्यक्ष राहुल कचरे, शहर संरक्षक राजू गायकवाड, हिशोब तपासनीस राहुल भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीत दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.