पुणे – फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामलिंग भगवान टेकाळे (वय 66 ) यांचे अल्पशा आजाराने ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. आंबेडकरी चळवळीत ते सक्रिय सहभागी होते. भारिप, भारिप बहुजन महासंघाच्या सुरुवातीच्या वाटचालीपासून ते बाळासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक राहिले आहेत. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी चळवळीशी प्रामाणिकता जपली.
बौद्ध धम्मा मध्ये दानाला महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे कमाईतील विसावा हिस्सा हा समाजासाठी द्यावा, ह्याचे त्यांनी तंतोतंत पालन केले. “प्रबुद्ध भारत” सुरू होत असतांना अनेकांनी आर्थिक, शारीरिक, ज्ञानाचा सहभाग नोंदवला, त्यात रामलिंग टेकाळे यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या निधनाने फुले,आंबेडकरी चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांना प्रबुद्ध भारत परिवाराच्यावतीने भावपूर्ण आदरांजली..