नांदेड : कॉ. अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठान, नांदेड आणि दैनिक गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन सोहळा तसेच जीवनगौरव, पत्रकारिता आणि प्रेरणादायी उत्कृष्ट संघटक पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी (दि. १७) उत्साहात पार पडला. नांदेड येथील कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात सामाजिक, पत्रकारिता, संघटन तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना जीवनगौरव, पत्रकारिता आणि उत्कृष्ट संघटक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांत आपल्या कार्यातून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते पुरस्कारार्थी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड महानगरपालिका नगरसेवक प्रशांत इंगोले, वंचितचे राज्यपाध्यक्ष फारुक अहमद, माजी खासदार रवींद्र चव्हाण, प्रवीण पाटील, शंतनु डोईफोडे यांच्यासह सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.




