अकोला : बाळापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावान कार्यकर्ते आणि भारिप बहुजन महासंघाचे तत्कालीन बाळापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडारे यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
राजेंद्र खंडारे हे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीमध्ये सुरुवातीपासून सक्रिय होते. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी खंडारे यांच्या भरतपूर (ता. बाळापूर) येथील गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी त्यांचे भाऊ, बहीण, पत्नी आणि मुलीसह महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक नागक्षण सावदेकर, गजानन गवई, संजय बावणे, डॉ. राजुस्कर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एसआरएच्या भ्रष्ट कारभाराविरोधात अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उद्या पुण्यात धडक मोर्चा
पुणे : महायुती सरकार व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कथित भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जीण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुणे शहर...
Read moreDetails





