Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ४ चिमुकल्यांचा बळी, ८ गंभीर जखमी

mosami kewat by mosami kewat
July 25, 2025
in बातमी
0
राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ४ चिमुकल्यांचा बळी, ८ गंभीर जखमी

राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ४ चिमुकल्यांचा बळी, ८ गंभीर जखमी

       

राजस्थान : राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी येथील एका सरकारी प्राथमिक शाळेत एक भीषण दुर्घटना घडली. शाळेचे जीर्ण छत अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून चार शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
‎
‎मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी शाळेचे कामकाज सुरू असताना अचानक छत कोसळले. त्यावेळी शाळेत सुमारे १७ विद्यार्थी उपस्थित होते. छताचा मोठा भाग कोसळल्याने विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.
‎
‎नागरिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखालून सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चार मुलांचा मृत्यू झाला होता, तर आठ जण गंभीर जखमी अवस्थेत आहेत. डांगीपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख विजेंद्र सिंह यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. या शाळेत एकूण २७ विद्यार्थी शिक्षण घेत होते.
‎
‎या हृदयद्रावक घटनेबद्दल राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवण्याचे आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत.


       
Tags: JhalawarRajasthanSchool roof collapse
Previous Post

राज्यात मुसळधार पावसामुळे ‘रेड अलर्ट’: कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Next Post

‘Saiyaara’ची झपाटलेली भरारी; ८०० वरून थेट २,००० स्क्रीन्सवर प्रदर्शित; लोकप्रियतेमागचं गुपित काय?

Next Post
'Saiyaara' या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. पहिल्यांदा केवळ ८०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट, वाढत्या मागणीमुळे आता थेट २,००० स्क्रीन्सवर झळकत आहे.

‘Saiyaara’ची झपाटलेली भरारी; ८०० वरून थेट २,००० स्क्रीन्सवर प्रदर्शित; लोकप्रियतेमागचं गुपित काय?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध
बातमी

बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध

by mosami kewat
July 26, 2025
0

खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन...

Read moreDetails
कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

July 26, 2025
कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे 'थाळी बजावो' आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

कळमनुरी PMKSY घोटाळा: VBA चे ‘थाळी बजावो’ आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी

July 26, 2025
बीडमध्ये 'होडी चलाव' आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

बीडमध्ये ‘होडी चलाव’ आंदोलन: धानोरा रोडच्या दुरवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

July 26, 2025
"केवळ गोरंट्याल नव्हे; राष्ट्रवादीचेही अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा"

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा खुलासा

July 26, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home