प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे प्रशासन नवनवीन बदल करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, रेल्वेने आता एक विशेष टूर पॅकेज आणले आहे, ज्या अंतर्गत प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे पैसे हप्त्यांमध्ये भरण्याची (EMI) सुविधा मिळणार आहे. यामुळे नियमित प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे तिकीट बुकिंग, वेटिंग तिकीट, रिझर्व्हेशन चार्जेस आणि तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केल्यानंतर, रेल्वेने आता EMI आधारित टूर पॅकेज सुरू केले आहे. IRCTC (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन), जे केवळ रेल्वे तिकीटच नाही तर देश-विदेशातील विविध टूर पॅकेजेस देखील ऑफर करते, त्यांनी ही अनोखी सुविधा ‘भारत गौरव यात्रा’ अंतर्गत दिली आहे.
काय आहे ‘भारत गौरव यात्रा’ आणि EMI सुविधा?
’भारत गौरव यात्रा’ हे रेल्वेकडून देशातील प्रसिद्ध तीर्थस्थळांसाठी देण्यात येणारे एक विशेष टूर पॅकेज आहे. या योजनेअंतर्गत प्रवास करण्यासाठी तुम्हाला आर्थिक चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही ट्रेनचे टूर पॅकेज सहज बुक करू शकता आणि प्रवासाचा आनंद घेतल्यानंतर त्याचे पैसे हप्त्याने चुकवू शकता. ही EMI सुविधा फक्त IRCTC च्या ‘भारत गौरव ट्रेन’ साठी उपलब्ध आहे.
किती आहे भाडे आणि EMI पर्याय?
समजा, तुम्ही 13 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंतच्या भारत गौरव ट्रेनचे तिकीट बुक केले. या ट्रेनच्या विविध श्रेणींचे भाडे खालीलप्रमाणे आहे:
१) इकोनॉमी क्लास: ₹18,460 प्रति व्यक्ती (स्लीपर क्लास ट्रेन तिकीट आणि हॉटेलमध्ये थांबण्याचा खर्च समाविष्ट)
२) थर्ड एसी कोच: ₹30,480 प्रति व्यक्ती
३) कम्फर्ट श्रेणी: ₹40,300 प्रति व्यक्ती
कुटुंबासोबत प्रवास करताना तिकीटाची रक्कम वाढू शकते, त्यामुळे रेल्वेने प्रवाशांसाठी ही EMI ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
EMI आणि LTC चा लाभ कसा घ्याल?
भारत गौरव ट्रेनचे भाडे चुकवण्यासाठी प्रवाशांना LTC (Leave Travel Concession) आणि EMI (Equated Monthly Installment) अशा दोन्ही सुविधा मिळतात. यासाठी IRCTC ने अनेक सरकारी आणि खासगी बँकांशी करार केला आहे. तुम्ही IRCTC च्या संकेतस्थळावरून तिकीट बुकिंग करताना EMI चा पर्याय निवडू शकता. ही बुकिंग ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाईल.रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे आता पर्यटनाची आवड असलेल्या अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Read moreDetails