पिंपरी-चिंचवड : देहू रोड परिसरात एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहून संतापाच्या भरात दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? ज्ञानेश्वर साबळे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे.
त्याने मध्यरात्रीच्या सुमारास आपली पत्नी आणि तिच्या प्रियकराला एकत्र पाहिले. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची त्याला कल्पना होती, मात्र यावेळी त्याने त्यांना रंगेहात पकडले. यानंतर ज्ञानेश्वरचा पारा इतका चढला की, त्याने रस्त्यावर पडलेल्या पेव्हर ब्लॉकने दोघांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली.
ज्ञानेश्वरची पत्नी विवाहित असून तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. पहिल्या पतीच्या निधनानंतर तिने ज्ञानेश्वर साबळेसोबत लग्न केले होते. मात्र, त्यानंतर तिचे एका मजुरी काम करणाऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध सुरू झाले. याच संबंधातून ही दुर्दैवी घटना घडली. देहूरोड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ज्ञानेश्वर साबळेला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.
Mahabodhi Mahavihara Protest : मुंबईत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश मोर्चा; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती!
मुंबई - महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी आज मुंबईत भव्य...
Read moreDetails