पुणे : वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर अंतर्गत पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३७, अप्पर डेपो येथे महिला आघाडीच्या नवीन शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. पुणे शहर अध्यक्षा अनिताताई चव्हाण यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. (pune)
या प्रभाग शाखेची बांधणी प्रभाग अध्यक्षा सारिकाताई भोसले आणि उपाध्यक्षा सुनिताताई शिंदे यांनी केली होती. त्यांनी अप्पर डेपो परिसरातील विविध भागांतील महिलांना एकत्र आणून ही नवीन शाखा स्थापन केली. उद्घाटन सोहळ्यात सर्व नवनिर्वाचित महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर महासचिव अॅड. रेखाताई चौरे यांनी केले. पुणे शहर उपाध्यक्षा वर्षाताई जाधव यांनी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नवीन शाखेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पुणे शहर संघटक निरंजनाताई सोनवणे, ख.वि. अध्यक्षा भारतीताई वांजळे, उपाध्यक्षा विजयमाला भालेराव, को. वि. अध्यक्षा ज्योतीताई शिंदे, प्रभाग ४३ अध्यक्षा मनीषाताई ओव्हाळ यांसह अनेक महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. (pune)
तसेच शामभाऊ गोरे, रवींद्रभाऊ गायकवाड, संदीपभाऊ चौधरी, परमेश्वर सनादे, महेश शिंगे, चंद्रकांत भोसले, शैलेश भिडे, बंटी डोलारे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणुकीत ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन
मुंबई: महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकच्या प्रचाराची रणधुमाळी संपली. उद्या मतदान करण्याचा सोनेरी दिवस उगवणार आहे. वेगवेगळ्या भागातून नागरिक मतदान करून आपले...
Read moreDetails






