Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune Crime : पुत्रप्राप्तीच्या नावाखाली महिलेची तीन लाखांची फसवणूक; पुण्यातील भोंदूबाबास अटक

mosami kewat by mosami kewat
September 11, 2025
in बातमी
0
Pune Crime : पुत्रप्राप्तीच्या नावाखाली महिलेची तीन लाखांची फसवणूक; पुण्यातील भोंदूबाबास अटक
       
पुणे : पुत्रप्राप्ती करून देतो असे सांगून एका महिलेकडून तब्बल ३ लाख १५ हजार रुपये उकळणाऱ्या एका भोंदूबाबास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हा भोंदूबाबा अंगारा देण्याच्या बहाण्याने महिलेला फसवून तिच्याकडून वेळोवेळी पैसे घेत होता. विशेष म्हणजे, यासाठी पीडित महिलेला आपले मंगळसूत्रही विकावे लागले.

या प्रकरणी गिरीश बलभीम सुरवसे (वय ३६, रा. भोसरी) याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहित महिलेला लग्नानंतर अपत्य होत नव्हते. वैद्यकीय उपचारादरम्यान, तिच्या ओळखीच्या व्यक्तीने तिला गिरीश सुरवसे याच्याबद्दल सांगितले. सुरवसेकडे ‘सिद्धी’ असल्यामुळे तो पुत्रप्राप्ती करून देईल, असा विश्वास तिला दिला. यावर विश्वास ठेवून ती सुरवसेकडे गेली. सुरवसेने तिला अंगारा दिला आणि लवकरच पुत्रप्राप्ती होईल असे सांगून तिच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यास सुरुवात केली.

या भोंदूगिरीसाठी महिलेने आपले मंगळसूत्र विकले आणि ते पैसे आरोपीला दिले. जेव्हा ही बाब महिलेच्या पतीला समजली, तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सुरवसेला अटक केली आहे. आरोपीने अशाप्रकारे आणखी काही महिलांची फसवणूक केली असण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली.

Tags: criminalFroudpolicepunePune crimeWomen
Previous Post

पुण्यात मोठा आयकर रिटर्न घोटाळा: हजारो कर्मचारी आयकर विभागाच्या रडारवर

Next Post

सोलापूरमध्ये जलप्रलय! 24 तासांत 118.3 मिमी पावसाची विक्रमी नोंद, जनजीवन विस्कळीत

Next Post
सोलापूरमध्ये जलप्रलय! 24 तासांत 118.3 मिमी पावसाची विक्रमी नोंद, जनजीवन विस्कळीत

सोलापूरमध्ये जलप्रलय! 24 तासांत 118.3 मिमी पावसाची विक्रमी नोंद, जनजीवन विस्कळीत

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती
अर्थ विषयक

भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती

by mosami kewat
March 13, 2026
0

- संजीव चांदोरकर " एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन आणि रशिया यांच्यामध्ये जागतिक पटावर भू राजनैतिक / आर्थिक...

Read moreDetails
इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

March 13, 2026
पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद

पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद

March 13, 2026
परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती 

परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती 

March 13, 2026
सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home