मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज प्रभाग क्र. १९६ वरळी विधानसभा क्षेत्रात “लोक आवाज – लोक संकल्प” हा जनसंपर्क उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश स्थानिक नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि प्रभागातील विविध त्रासदायक मुद्दे जाणून घेणे असा होता. नागरिकांनी फॉर्म भरून आपल्या तक्रारी, सूचना व अपेक्षा मांडल्या.
या कार्यक्रमादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.
यावेळी कार्यक्रमाला मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष राकेश कांबळे, सदस्य आकाश दोडके, उपाध्यक्ष अशोक गुजेट्टी, जिल्हाध्यक्ष विद्याधर गायकवाड, राजेंद्र बडेकर, मोहम्मद नबी शेख, बिजू गायकवाड, बबन हिरवे, सुधाकर रणखांबे, अमोल कांबळे आणि विशाल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपक्रमाचे आयोजन प्रभाग समन्वयक अमोल साळुंके, निखिल चव्हाण, संतोष शिर्के, प्रकाश पाटील, सुषमा गायकवाड, शीतल बडेकर, सरिता हिरवे आणि अर्चना जावळे यांनी केले. कार्यक्रमात प्रभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“लोक आवाज – लोक संकल्प” या उपक्रमातून वंचित बहुजन आघाडीने जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्याचा आणि त्यांच्या समस्यांचे समाधान करण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला आहे.






