Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भांडुपमध्ये संरक्षण भिंत कोसळली; वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी घटनास्थळी, प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप‎‎

mosami kewat by mosami kewat
August 20, 2025
in बातमी
0
भांडुपमध्ये संरक्षण भिंत कोसळली; वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी घटनास्थळी, प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप‎‎
       
मुंबई : सध्या राज्यभरात पाऊसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे. सर्व सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये सर्वांत जास्त डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचे हाल झाले. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागत आहे. ‎‎अशातच भांडुप पश्चिम येथील कांबळे कंपाऊंडमधील लक्ष्मीबाई आकाराम कांबळे चाळीची संरक्षक भिंत कोसळली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रशासनाच्या वारंवार दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या भिंतीच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे अर्ज केले होते, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.‎‎स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून ही संरक्षक भिंत जीर्ण झाली होती आणि कधीही कोसळण्याची भीती होती.

रहिवाशांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली होती, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण आहे.‎‎घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून नागरिकांना धीर दिला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश महासचिव विश्वास सरदार, वंचित बहुजन महिला आघाडीच्या माजी तालुका महासचिव रंजना कांबळे, तसेच राहुल बनसोडे, राहुल जाधव, रोहित कांबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.‎

Tags: BhandupcollapseMonsoonmumbairain
Previous Post

नागपूर: ज्येष्ठ कृषी अभ्यासक अमिताभ पावडे यांचे अपघाती निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून श्रद्धांजली

Next Post

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर बाळाचा मृत्यू; आरोग्य सुविधांच्या अभावामुळे दुर्दैवी घटना

Next Post
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर बाळाचा मृत्यू; आरोग्य सुविधांच्या अभावामुळे दुर्दैवी घटना

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर बाळाचा मृत्यू; आरोग्य सुविधांच्या अभावामुळे दुर्दैवी घटना

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…
बातमी

सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…

by mosami kewat
July 21, 2026
0

- संजीव चांदोरकर  देशातील सर्व विद्यार्थी तरुणांचे अभिनंदन आणि आभार !  …..  देशातील शिक्षण क्षेत्राचा ज्वलंत विषय,  गेली अनेक वर्ष...

Read moreDetails
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

July 21, 2026
२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

July 21, 2026
आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

July 21, 2026
SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home