मुंबई : मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले आहे. त्या ३८ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. मध्यंतरी त्या या दुर्धर आजारातून बरी देखील झाल्या होत्या. मात्र, पुन्हा त्यांच्या शरीरात कर्करोग पसरू लागला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी त्यांचे निधन झाले आहे.
अभिनेत्री प्रिया यांनी ‘पवित्र रिश्ता’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ आणि ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली होती. त्यांना अनेक आरोग्य समस्यांमुळे त्यांना ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अर्धवट सोडावी लागली होती.
ठाणे येथे २३ एप्रिल १९८७ रोजी त्यांचा जन्म झाला होता. प्रिया मराठे यांनी २००६ साली ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बड़े अच्छे लगते हैं’, ‘तू तिथे मी’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले.
तसेच ‘विघ्नहर्ता महागणपती’ (२०१६) आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ (२०१६) या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब
हिंगोली : महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तिन्ही धरणांतून पाण्याचा...
Read moreDetails