Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये – सिद्धार्थ मोकळे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 21, 2023
in राजकीय
0
पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये – सिद्धार्थ मोकळे
       

मुंबई – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत सहभाग का होत नाही? याबाबत उलटसुलट विधाने केली आहेत. वंचित बहुजन आघाडीवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्याला मी राजकिय भडवेगीरी म्हणतो. ती राजकीय भडवेगीरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. असा घणाघाती पलटवार वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केला.

आज त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, वंचित बहुजनांचा मोठा समूह घेऊन व्यवस्थेने नाकारलेल्या, सत्तेच्या बाहेर फेकलेल्यांचा एकत्रित पक्ष उभा करून बाळासाहेब आंबेडकर त्यांना राजकारणात आणतात आणि सत्तेकडे कूच करतात. समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासारख्या बलाढ्य शक्ती आहेत त्यांना न घाबरता हिंमतीने, ताकदीने, थेट अचूकपणे आणि परखडपणे त्यांच्यावर टीका कोण करत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर हे आहेत.

इंडिया आघाडीची मोट बांधली गेली आहे. भाजपच्याविरोधात लढण्यासाठी त्यात आम्ही सहभागी होऊ इच्छितो. सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला रोखलं पाहिजे ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने घेतली. सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांतून आम्ही ती भूमिका काँग्रेसपर्यंत पोहचवली. सभा, मीडिया आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका पोहचवली. यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी ज्या काही कोलांट्या उड्या मारल्या त्या सगळ्या आपण बघितल्या आहेत.

ज्या पक्षाने २०१९ मध्ये आपली ताकद दाखवली आहे. २०१९ नंतर ज्या पक्षाची ४४ लाख मतांची संख्या आज कैकपटीने आपल्याला वाढलेली दिसत आहे. ज्या पक्षाची आज गावपातळीवर वॉर्डपर्यंत पक्ष बांधणी आहे. आणि ज्या पक्षाची कसलीही राजकीय हवा नसताना, भावनिक लाट नसताना, निवडणुकी नसताना लाखांच्या सभा होत आहेत. एकही रुपया न देता लाखों लोक सभेला येत आहेत. तर अशा बलशाली पक्षाला इंडिया आघाडीत घेण्यापासून तुम्हाला कोण रोखत आहे? असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी 2 वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाण्यासाठी कॉल केला होता की नाही याचं उत्तर आधी द्यावे.

*काँग्रेस पक्षाविरोधात बंड करणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नैतिकता आहे का?*

काँग्रेस पक्षाविरोधात बंड करणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नैतिकता आहे का? असा थेट सवाल सिद्धार्थ मोकळे यांनी विचारला आहे. G-23 नावाचा काँग्रेस पक्षामधील एका गटाने काँग्रेस पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्या गटाचे पृथ्वीराज चव्हाण हे सदस्य होते आणि आपला स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आणि नसलेली पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी ते वंचित बहुजन आघाडीला बदनाम करत आहेत.

वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या निवडणुकीत तुम्ही ५ वेळा सलग हरलेल्या लोकसभेच्या १२ जागा आम्हाला द्या, आम्ही लोकसभेला तुमच्यासोबत येतो. बाकी जागांवर आम्ही तुम्हाला समर्थन देतो अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकर यांची होती. पण, काँगेसने वेळखाऊपणा केला. गोदी मीडिया जसा भाजपच्या गोदीत बसला आहे, तसा तो काँग्रेसच्या पण गोदीत बसला आहे. त्या मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवल्या.

बाळासाहेबांना भेटायला यायचं ४-५ जणांनी नाटक करायचं आणि बाहेर जाऊन माध्यमांना म्हणायचं की, बाळासाहेबांना आम्ही विनंती केली की, आमच्यासोबत या पण बाळासाहेब यायला तयार नाहीत. या सगळ्यांना बाळासाहेबांनी एकच प्रश्न केला होता की, तुम्हाला जागा वाटपाचा अधिकार आहे का? असेल तर आता आपण बसून जागावाटप ठरवू. त्यावेळी हे म्हणायचे आम्हाला हा अधिकार नाही आमच्या दिल्लीतील हायकमांडला हा अधिकार आहे. तेव्हा बाळासाहेब आंबेडकर त्यांना म्हणायचे तुम्हाला तो अधिकार नाही तर मी तुमच्याशी चर्चा काय करणार ? ठरवणार काय? ज्यांना अधिकार आहे त्यांना बोलवा आपण जागावाटप करू. पण यांनी एकाही दिल्लीतील अधिकार असलेल्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं नाही. का बोलावलं नाही? कारण यांना युती करायची नव्हती, केवळ वंचित बहुजन आघाडीला बदनाम करायचं होत, वंचितांच्या राजकारणाला बदनाम करायचं होत म्हणून त्यांनी हा डाव खेळला.

पृथ्वीराज चव्हाणसारखे नेते हे गरीब मराठा समाजांचे झाले नाहीत ते वंचित आणि बहुजनांचे काय होणार? यांना राजकीय गणितं करून यांना सत्ता स्वतःकडे ठेवायची आहे. स्वताच्या मराठा समाजातील तरुणांना हे नोकरी उपलब्ध करून देऊ सकले नाहीत. स्वताच्या शिक्षण संस्थेत, कारखान्यात इतर ठिकाणी गरिब मराठा समाजातील तरुणांना हे कामाला लावू शकले नाहीत. असा सरंजामशाही नेता आमच्यावर शिंतोडे उडवतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं देशासाठी योगदान हे जगाला माहित आहे.

त्यांच्या विचारांचा आणि रक्ताचा वारसदार असलेल्या नेत्यावर बोलायची हिंमत कशी होती ? यापुढे याद राखा जर वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर घाणेरडे आरोप केले तर गाठ आमच्याशी आहे.

वंचित आघाडीने सातत्याने सकारात्मक पाऊले उचलली, संवाद केला. 25 नोव्हेंबर रोजी छ. शिवाजी महाराज पार्कवर झालेल्या सभेचे निमंत्रण आम्ही राहुल गांधींना पाठवलं याचा अर्थ सगळ्यांना कळाला. जेव्हा तुम्ही म्हणता की, दलित, मुस्लीम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे नाहीये, तेव्हा त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही वंचितच्या लाखोंच्या सभा उघड्या डोळ्यांनी बघा.

सर्व देशाला माहीत आहे की, वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीचा भाग होण्यासाठी स्वतःहून सातत्याने प्रयत्न करत आहे. हे आम्ही 1 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षांना पत्र पाठवून कळवले आहे. त्या नंतरही सातत्याने आम्ही प्रयत्न करतोय.

इंडिया आघाडील निमंत्रक आहे का?

 आमचा मित्र पक्ष शिवसेनेला सांगितले की, इंडिया आघाडीला आजापर्यत निमंत्रक नाहीये. तर अशा परिस्थितीत कुठल्या निमंत्रकाला पत्र लिहावे? ? त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणने खोटे बोलू नये. तुमचा खोटारडेपणा सबंध महाराष्ट्र बघतोय.


       
Tags: Prakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

युवकांनी केले ‘घाटलाडकी गाव’ वंचितमय !

Next Post

नारायण राणेंच्या आरोपावर ‘ वंचित’ चे थेट उत्तर !

Next Post
नारायण राणेंच्या आरोपावर ‘ वंचित’ चे  थेट उत्तर !

नारायण राणेंच्या आरोपावर ' वंचित' चे थेट उत्तर !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎'रक्षकच भक्षक बनू नये', पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव
बातमी

‎’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

by mosami kewat
August 11, 2025
0

‎अकोला - वंचित बहुजन महिला आघाडीच्या अकोला जिल्हा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक...

Read moreDetails
‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो - प्रकाश आंबेडकर

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर

August 11, 2025
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

August 11, 2025
'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎'इंडिया' आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎’इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

August 11, 2025
‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

August 11, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home