सत्ता परिवर्तन महासभेत 144 क्राउडफंडीग मोहिमेची सुरुवात
पुणे : वंचित बहुजन आघाडीने सत्तेत येण्यासाठी आणि महाराष्ट्रात राजकारणाची दिशा बदलवण्यासाठी पुण्यात सत्ता परिवर्तन महासभा आयोजित केली आहे. या सभेत 144 क्राउड फंडिंगची मोहिम लाॅंच केली आहे. या मोहिमेद्वारे सर्वसामान्यांनी हा लढा आणखी बळकट करण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी साद या सभेतून घालण्यात आली. यासाठी प्रत्येक खुर्चीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले व त्यावर क्यूआर कोड असेल स्टिकर लावण्यात आले होते.
वंचित बहुजन आघाडीने सत्ता परिवर्तन महासभेत 144 क्राउड फंडीगची मोहिम लाॅंच केली. या वेळी पहिली मदत प्रवीण रणबागुल यांनी 144000 रुपयांचा चेक ॲड. प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आला.
14 एप्रिल हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन आहे. त्यामुळे त्यांचा विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी तसेच, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा लढा बळकट करण्यासाठी आर्थिक मदत लागणार आहे. त्यामुळे 144 – 1440, 14400, 144000 अशा पद्धतीने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. ही घोषणा करण्यात आल्यानंतर सभेला उपस्थित नागरिकांनी खुर्च्यांवर लावण्यात आलेल्या क्यूआर कोडद्वारे मदत करुन आवाहनाला प्रतिसाद दिला. तसेच, 144 ही संकल्पना जनतेला आवडली असून या पद्धतीची मोहिम पाहून नागरिक भारावून गेल्याचे दिसून आले.