उस्मानाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात पायी चालले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, जरांगे पाटील यांनी दहा – पंधरा लोकांच्या मध्ये बसून जेवण करू नये. सोबत जी जनता आलेली आहे त्यांनी जे अन्न सोबत आणला आहे त्याचं सेवन त्यांनी करावं. त्याचसोबत त्यांनी निजामी मराठ्यांपासूनही सावध राहावे. असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण आंदोलन कर्त्यांचं म्हणणं आहे की, ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या परंतु कायदेशीर अडचणीमुळे ते आरक्षण ओबीसीतून देता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
उस्मानाबाद येथे होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यासाठी गेले असताना त्यांनी माध्यमांशी याविषयी संवाद साधला.