Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पंतप्रधान मोदींसह अंबानींच्या फोटोंची जालन्यात होळी; एपस्टिन फाईल्स प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
March 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंतप्रधान मोदींसह अंबानींच्या फोटोंची जालन्यात होळी; एपस्टिन फाईल्स प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       
जालना : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना येथे केंद्र सरकार आणि संबंधित उद्योगपतींविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वाखाली जुना जालना भागातील गांधी चमन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती अनिल अंबानी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्या फोटोंची होळी करून निषेध नोंदवण्यात आला. (Jalna news)

नुकत्याच समोर आलेल्या एपस्टिन फाईल्समध्ये भारतातील काही बड्या नेत्यांची आणि उद्योजकांची नावे आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत जालन्यात हे आंदोलन केले. देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन करणाऱ्या या व्यक्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी भूमिका यावेळी जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी मांडली. (Jalna news)

गांधी चमन येथे झालेल्या या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने प्रशांत कजबे (जिल्हा महासचिव), शेख लालाभाई (जिल्हा उपाध्यक्ष), प्रकाश मगरे (बदनापूर तालुका अध्यक्ष) हरिष रत्नपारखे (युवा जिल्हा उपाध्यक्ष), गौतम वाघमारे (जालना तालुका सचिव) दिपक खाजेकर (तालुका महासचिव), अमोल वाहुळे (सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष), विलास भिंगारे, सचिन घोडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (Jalna news)

यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. एपस्टिन फाईल्समधील नावांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Tags: Epstein fileJalna newsMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पंचशील आणि २२ प्रतिज्ञांचे आचरण हाच खरा धम्मप्रचार; माजलगाव येथे जिल्हास्तरीय धम्मप्रचारक गौरव सोहळा उत्साहात पार

Next Post

औरंगाबाद महानगरपालिक स्थायी समिती सदस्यपदी वंचितचे अमित भुईगळ यांची निवड

Next Post
औरंगाबाद महानगरपालिक स्थायी समिती सदस्यपदी वंचितचे अमित भुईगळ यांची निवड

औरंगाबाद महानगरपालिक स्थायी समिती सदस्यपदी वंचितचे अमित भुईगळ यांची निवड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 
बातमी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

by mosami kewat
September 29, 2026
0

- संजीव चांदोरकर  “ तुमच्या दोघांच्या भेटीतून आमच्यासाठी फार काही निष्पन्न झाले नाही तरी तुम्ही ( व्यक्ती म्हणून नाही तर...

Read moreDetails
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home