Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चीनसारखी एकाधिकारशाही भाजपला भारतात आणायची! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा

mosami kewat by mosami kewat
January 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
चीनसारखी एकाधिकारशाही भाजपला भारतात आणायची! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा
       

पिंपरी-चिंचवड : “भारतीय जनता पक्षाचा देशामध्ये एकाधिकारशाही आणण्याचा डाव असून, त्यांना चीनसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे कंबरडे मोडा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते.

संविधान बदलण्याचा भाजपचा डाव

ॲड. आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “भाजपचा निश्चय पक्का आहे की या देशात फक्त एकाच पक्षाचे राज्य राहिले पाहिजे आणि इतर सर्व पक्ष संपले पाहिजेत. जिथे कोणालाही विरोधाचा आवाज उठवता येणार नाही, अशी चीनसारखी परिस्थिती त्यांना भारतात आणायची आहे. एकदा का एका पक्षाचे राज्य आले की, हे लोक देशाचे संविधान कधीही बदलू शकतात.”

उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनतेची लूट

देशाच्या आर्थिक धोरणांवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, “परदेशातील आयात-निर्यातीतून होणारा नफा भारतीय जनतेच्या हितासाठी वापरला जात नाही. ४० हजार कोटींचा नफा भारताच्या तिजोरीत जाण्याऐवजी तो थेट अंबानींसारख्या उद्योगपतींच्या खिशात घातला जात आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यात केवळ अहंकाराचे भांडण सुरू असून त्याचा फटका देशाला बसत आहे.”

माध्यमांच्या गुलामगिरीवर टीका

प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना त्यांनी नमूद केले की, “आज देशातील मोठ्या वर्तमानपत्रांचे आणि टीव्ही चॅनेलचे मालक मोदींचे गुलाम झाले आहेत. सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याऐवजी ते सत्तेची चाकरी करत आहेत. मला कितीही विरोध झाला तरी मी कोणालाही घाबरणार नाही. जे सामान्य जनतेला गुलाम करायला निघाले आहेत, त्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे.”

‘वंचित’ला विजयी करण्याचे आवाहन

अमेरिकेने मोदींच्या विरोधात १२ वर्षांपूर्वी काढलेल्या अरेस्ट वॉरंटची आठवण करून देत, आंबेडकरांनी भाजपच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर प्रहार केला. “देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात मतदान करा. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड येथील ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेत जनसागर उसळला होता. या सभेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच नागरिकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. या जाहीर सभेला पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिक, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: ElectionMaharashtraMaharashtra electionPimparipimpari chinchwadpoliticsPrakash AmbedkarPune electionVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

महू नगर, राहुल नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावती दौरा; ‘वंचित’च्या उमेदवारांसाठी प्रत्यक्ष जनसंवाद

Next Post

प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

Next Post
प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा - ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
बातमी

जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

by mosami kewat
February 19, 2026
0

जालना : शहरातील अंबड चौफुली व मंठा बायपास रोड परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्ना सिरसाठ यांचा विशेष सत्कार

वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्ना सिरसाठ यांचा विशेष सत्कार

February 19, 2026
‘एपस्टीन फाईल्स’वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक

‘एपस्टीन फाईल्स’वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक

February 19, 2026
मोदी सरकारवर ट्रम्पचा दबाव आहे का? ; राफेल खरेदीवरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारला प्रश्न!

मोदी सरकारवर ट्रम्पचा दबाव आहे का? ; राफेल खरेदीवरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारला प्रश्न!

February 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराज हे ‘विभाजनाचे’ नव्हे, तर ‘ऐक्याचे’ प्रतीक: योगेश साठे

छत्रपती शिवाजी महाराज हे ‘विभाजनाचे’ नव्हे, तर ‘ऐक्याचे’ प्रतीक: योगेश साठे

February 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home