जळगाव : जामनेर येथे झालेल्या मॉब लिंचिंगमध्ये (जमावाकडून मारहाण) मृत्यूमुखी पडलेल्या सुलेमान पठाण या 21 वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या, शनिवार, 30 ऑगस्ट रोजी भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत.
11 ऑगस्ट 2025 रोजी जामनेर येथे ही दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने याआधीच जामनेर येथे मोठा मोर्चा काढला होता.
तसेच, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि माजी आमदार नातिकोउद्दीन खतीब आणि राज्य प्रवक्ते तय्यब जफर यांनी सुलेमानच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी, कुटुंबीयांनी आरोपींवर ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती.
सुलेमान पठाण हा एका कॅफेमध्ये एका मुलीसोबत बसलेला असताना काही लोकांनी त्याला जबरदस्तीने बाहेर काढले आणि अमानुषपणे मारहाण केली. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता.
संघटना मजबूत करण्यासाठी जनसामान्यांचे प्रश्न सोडावा – चेतन गांगुर्डे
सिन्नर येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक : सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुरवातीला जिल्हा अध्यक्ष...
Read moreDetails