Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक: प्रकाश आंबेडकरांची भूमिका लवकरच स्पष्ट; वकिलांकडून संपूर्ण पॅनेल साठी आग्रह

mosami kewat by mosami kewat
February 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक: प्रकाश आंबेडकरांची भूमिका लवकरच स्पष्ट; वकिलांकडून संपूर्ण पॅनेल साठी आग्रह
       

मुंबई: महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, कायदेतज्ज्ञांच्या या वर्तुळात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  वैयक्तिक उमेदवाराऐवजी संपूर्ण पॅनलला पाठिंबा द्यावा, अशी मागणी वकिलांकडून होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, लवकरच यावर अधिकृत निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Prakash ambedkar)

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली की, फुले-शाहू-आंबेडकरी आणि मानवतावादी चळवळीत सक्रिय असलेले अनेक वकील त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली आहे की, निवडणुकीत कोणत्याही एका वैयक्तिक उमेदवाराला पाठिंबा देऊ नये. जर पाठिंबा द्यायचा असेल, तर तो संपूर्ण पॅनलला दिला जावा, जेणेकरून संघटनेत धोरणात्मक बदल घडवून आणता येतील, असे त्यांनी सांगितले. 

या संदर्भात आमचा विचार सुरू आहे. वकिलांच्या भावना आणि चळवळीचे हित लक्षात घेऊन लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Prakash ambedkar)

सध्या केवळ महाराष्ट्र आणि गोवाच नव्हे, तर देशातील विविध राज्यांच्या बार कौन्सिलच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने पार पडत आहेत. वकिलांच्या या सर्वोच्च संघटनांवर वर्चस्व मिळवण्यासाठी विविध संघटना आणि राजकीय विचारांचे गट सक्रिय झाले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे आता कायदे क्षेत्रातील तज्ज्ञांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.


       
Tags: ElectionGoaMaharashtra goa bar councilmumbaiPoliticalPrakash Ambedkar
Previous Post

मुंबई : गोरेगावमधील ४५ मजली इमारतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

Next Post
कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बातमी

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

by mosami kewat
March 26, 2026
0

पनवेल : वंचित बहुजन आघाडीच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे...

Read moreDetails
‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

March 26, 2026
औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

March 26, 2026
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

March 26, 2026
नागपूरची ठिणगी !

नागपूरची ठिणगी !

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home