स्वतःची ओळख आणि विचारांवर ठाम राहण्याचे केले आवाहन
मुंबई : Made in Heaven 2 मधील प्रतिकार करणारी, आव्हान देणारी तसेच स्वतःची ओळख व विचारांवर ठाम असणारी पल्लवी हे दलीत स्त्री पात्र आवडलं असल्याचे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
Everything is about Politics असा संवाद असलेला नायिकेचा फोटो आणि गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेल्या दृश्याचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. “हा एपिसोड ज्या वंचित आणि बहुजनांनी पहिला असेल त्यांनी हे शिकण्यासारखं आहे. तुम्ही स्वतःची ओळख व विचारांवर ठाम राहिलात तरच तुम्हाला राजकीय महत्व, वैभव प्राप्त होईल. पल्लवी म्हणते त्याप्रमाणे ‘सगळं काही राजकारणाशी निगडित आहे’ जयभीम !” असे मार्मिक ट्विट ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केलेल्या Made in Heaven 2 या सिरिज मधील या एपिसोडची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिरीज मधील निवडक दृष्यांवर अतिशय मार्मिक ट्विट करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एकप्रकारे वंचित बहुजन समाजाला थेट उघडपणे आपली राजकीय भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.