Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त; प्रकाश आंबेडकर यांचे अभिवादन; ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये आणि क्रांतीकारक कादंबरीकार’ म्हणत केले स्मरण

mosami kewat by mosami kewat
August 1, 2025
in बातमी
0
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त; प्रकाश आंबेडकर यांचे अभिवादन; 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये आणि क्रांतीकारक कादंबरीकार' म्हणत केले स्मरण

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त; प्रकाश आंबेडकर यांचे अभिवादन; 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये आणि क्रांतीकारक कादंबरीकार' म्हणत केले स्मरण

       

मुंबई : महान साहित्यिक, लोककवी आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स (ट्विटर) च्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण केले.
‎
‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये, ‘समाजातील तळागाळातील लोकांच्या वेदना, संघर्ष आणि आशा यांना आपल्या शब्दांत उतरवणाऱ्या थोर साहित्यिक, लोककवी आणि क्रांतीकारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’ असे म्हटले.
‎
‎अण्णा भाऊ साठे यांच्या योगदानावर प्रकाश टाकताना, आंबेडकर म्हणाले की ते केवळ तमाशा, पोवाडे आणि लोककथांमध्ये रमणारे साहित्यिक नव्हते, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक महत्त्वपूर्ण लढवय्ये होते. ‘मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी’ त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या पोवाड्यांनी जनतेच्या मनात स्वाभिमान जागवला.
‎
‎यासोबतच, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या क्रांतिकारी कादंबरी ‘फकिरा’ चाही विशेष उल्लेख केला. ही कादंबरी आजही सामाजिक क्रांतीचा झंझावात उभा करते आणि वंचितांना त्यांच्या स्वाभिमानाची आठवण करून देते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आजच्या काळातही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार, त्यांची भाषा आणि त्यांचा लढाऊ बाणा अनेकांना नवीन संघर्षासाठी प्रेरणा देतो, असेही ते म्हणाले.

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले अण्णा भाऊ साठे यांना केले अभिवादन; ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये आणि क्रांतीकारक कादंबरीकार’ म्हणत केले स्मरण
‎
‎
‎


       
Tags: Annabhau Sathe birth anniversaryMaharashtraPrakash Ambedkarvbaforindia
Previous Post

बारामती-इंदापूर मार्गावर एसटी बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला

Next Post

किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटोदा येथे विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल मोर्चा

Next Post
किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटोदा येथे विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल मोर्चा

किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटोदा येथे विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल मोर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
बातमी

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

by mosami kewat
April 12, 2026
0

Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home