मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीने मुंबईत आपली पूर्ण ताकद लावली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर आज मुंबईच्या दौऱ्यावर असून, ते पाच ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्याची सुरुवात घाटकोपरमधून होणार असून, त्यानंतर ते गोवंडी, चेंबूर आणि वडाळा या भागांत मतदारांशी संवाद साधणार आहेत. या सभांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी मुंबईतील मतदारांना साद घालणार आहे.
अशा होणार सभा
- जाहीर सभा वेळ : सायं. ६:०० वाजता स्थळ : माता रमाबाई आंबेडकर नगर, डी. बी. पवार चौक घाटकोपर पूर्व,
- जाहीर सभा वेळ : सायं. ६:४५ वाजता स्थळ : लुंबिनी बाग, गोवंडी
- जाहीर सभा वेळ : सायं. ७:४५ वाजता स्थळ : वैशाली बुद्ध विहार. नागा बाबा नगर, आर सी मॉर्क वाशी नाका, चेंबूर
- जाहीर सभा वेळ : सायं. ८:४५ वाजता स्थळ : मुकुंदराव आंबेडकर नगर, वाशी नाका
- जाहीर सभा वेळ : रात्री ९:३० वाजता स्थळ : कोरबा मिठागर, वडाळा
या जाहीर सभांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर मुंबईतील स्थानिक समस्या, गृहनिर्माण, झोपडपट्टी पुनर्विकास आणि मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार या मुद्द्यांवर महायुती आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडीची स्वतंत्र ताकद निर्माण करण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वच सभांच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे.






